किसन कांबळे सर 9970381507
लहान मुले ही नेहमी मोठ्या व्यक्तींचे अनुकरण करत असतात त्यामुळे समाजातील मोठ्या व्यक्तींनी सार्वजनीक व कौटूंबिक जीवन जगताना नशेचा त्याग केला तर पुढची पिढी ही व्यसनांपासून दूर होईल असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या सशक्त भारत अभियान आणि नशा मुक्त भारत अभियान या अंतर्गत काम करीत असलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग चे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर महेश वैद्य यांच्या कामाची दाखल घेऊन जि.प.प्रा.शाळा कोंढेज येथे जेऊर केंद्राच्या शिक्षण परिषदेत सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी महेश वैद्य यांचा परीचय मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी करून दिला.
जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण (बापू) भंडारे सर , मुख्याध्यापक अशोक गवेकर सर केंद्रीय मुख्याध्यापक सदाशिव जगदाळे सर, जेऊरवाडी शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे सर यांच्या हस्ते महेश वैद्य यांचा सत्कार करण्यात आला.
आजची लहान मुले ही उद्याचे भारताचे उज्वल भविष्य आहे. उद्याचा भारत सशक्त आणि सदृढ करायचा असेल तर आजपासून सुरुवात केली पाहीजे. नशा मुक्त भारत हे यातील पहिले पाऊल आहे. भारताचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहीजे असे मत किसन कांबळे सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब खटके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुंडलिक केकाण सर यांनी मानले.
हा कार्यक्रम अल्पोपहार च्या वेळेस झाला. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
