वैराग ता. बार्शी
किसन कांबळे सर (MCJ) 9970381507
स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या सोलापूर जिल्हा कार्यकारणी मध्ये नशा मुक्त भारत अभियान चे ब्रांड अंबेसेटर आणि सशक्त भारत अभियानाचे प्रशिक्षक महेश वैद्य यांची सोलापूर जिल्हा स्वाभिमानी मराठा महासंघ चे अध्यक्ष माननीय महेंद्र भाऊ निंबाळकर वैराग यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना महेंद्र निंबाळकर म्हणाले की महेश वैद्य करत असलेले काम नशा मुक्त भारत अभियान व सशक्त भारत अभियान हे दोन्ही उपक्रम सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे त्यांचे काम पाहून प्रभावित होणे आम्ही त्यांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जिल्हा सदस्य कार्यकारणीवर निवड केली आहे भविष्यात त्यांच्या कामाचा सर्व समाजाला लाभ होईल असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मराठा महासंघाने त्यांचे निवड केली आहे
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनुसार त्यांना अपेक्षित असा महाराष्ट्र आपण घडूयात म्हणजेच नशा मुक्त महाराष्ट्र आणि सशक्त महाराष्ट्र हे काळाची गरज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असेच हे कार्य आहे.या जोडीमध्ये आपणाला विशेष प्रेरणा मिळाली आणि यापुढे जोमाने काम करू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असा महाराष्ट्र घडवूया हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले..
