करमाळा
किसन कांबळे सर (MCJ) 9970381507
लंडन स्थित उद्योगपती अनिकेतजी सरदेसाई यांच्याकडून हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी मुंबई आणि गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था एनजीओ यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या फिटनेस कॅम्प साठी आर्थिक सहकार्य करण्यात आले.
हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महेश वैदय यांचे लंडन स्थित मित्र अनिकेत सरदेसाई म्हणाले की सशक्त भारत अभियान राबवण्यासाठी प्रशिक्षक महेश वैद्य हे करत असलेले कार्य सामाजिक बदल घडवणारे आहे आणि त्यासाठी प्रेरणा म्हणून सहकार्याचा हात पुढे केला आहे.
महेश वैद्य यांनी प्रत्येक जिल्ह्यात 100 फिटनेस कॅम्प घेण्यासाठी संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्य होईल तेवढी मदत देण्याचे आश्वासन मा. अनिकेत जी सरदेसाई यांनी सांगितले.
गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य (NGO) चे अध्यक्ष किसन कांबळे सर राबवित असलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच इतर मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचे कौतूक मा अनिकेत सरदेसाई यांनी केले.
सशक्त भारत आणि नशा मुक्त भारत एक व्यापक चळवळ आहे आणि त्यासाठी महेश वैदय व किसन कांबळे सर प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यात त्यांना यश लाभो अशी भावना मा. अनिकेत सरदेसाई व्यक्त केली.
यापुढे भविष्यात संस्थेच्या सामाजिक कार्यास आपणाकडून सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त करून महेश वैद्य व किसन कांबळे सर (MCJ) यांनी मा.अनिकेत सरदेसाई यांचे आभार मानले.
