कळंब
किसन कांबळे सर (MCJ) 9970381507
संत ज्ञानेश्वर मूकबधिर निवासी आश्रम शाळा कळंब येथे नशा मुक्त भारत अभियान मोठ्या उत्साहात संपन्न…
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार चे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित नशामुक्त भारत अभियान राबविण्यात आले.
संत ज्ञानेश्वर मूकबधिर निवासी आश्रमशाळा येथे विद्यार्थी विद्यार्थिनींना नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या हस्ते ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य यांचा सत्कार करण्यात आला तसेच रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष अरविंद शिंदे सर यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
मुले मुली या मूकबधिर असून देखील त्यांचा सहभाग अतिशय स्तुत्य होता विशेष बाब म्हणजे शाळेतील शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनींना महेश वैद्य हे करत असलेल्या मार्गदर्शनाचा सांकेतिक खुणा द्वारे विद्यार्थ्यांना सांगत होत्या आणि त्याप्रमाणे विद्यार्थी अनुकरण करत होते हे दृश्य अतिशय संस्मरणीय होते या कार्यक्रमास रोटरी क्लबचे ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष माननीय अरविंद शिंदे सर होते.
अश्रुबा कोठावळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना व्यायामाचे बेसिक प्रशिक्षण दिले आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हे अतिशय मनापासून केले त्याबद्दल महेश वैद्य यांनी त्यांचे कौतुक केले.
रोटरी क्लब ऑफ कळम सिटी चे अध्यक्ष अरविंद सर यांच्या विनंतीला मान देऊन संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय चे मुख्याध्यापक बी.पी जाधवर सर या उपक्रमाचे आयोजन केले.
यावेळेस शिक्षक आश्रुबा कोठावळे, शिक्षिका श्रीमती सुनिता गुंड आणि सुनंदा गायकवाड
या उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या हस्ते ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य यांचा सत्कार करण्यात आला तसेच रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष अरविंद शिंदे सर यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
