कळंब
किसन कांबळे सर 9970381507
केंद्र सरकार द्वारा नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत करीत असलेल्या कामाबद्दल वनमाला बबनराव वैद्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा जि. सोलापूर महाराष्ट्र , हॅप्पी माईंड हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्र सरकार द्वारा नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा परिषदे समाज कल्याण विभागचे ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य यांचा सत्कार रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी , जिल्हा धाराशिव तर्फे रोटरी क्लबचे चे सन्माननीय प्राध्यापक घुले सर यांच्या हस्ते मान सन्मान झाला.
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अरविंद शिंदे सचिव काथे सर आणि वर्धमान ज्वेलर्स चे संजय देवडा, डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरोग्याचे महत्त्व समजले पाहिजे, त्यासाठी आवश्यक व्यायाम, सकस आहार आणि शिक्षणाची जोड असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
नशा मुक्त भारत अभियान राबविताना असे लक्षात आले की किमान 90% लोक कोणत्या ना कोणत्या नशील्या पदार्थाच्या आहारी गेले आहेत. येणारी जी पिढी आहे म्हणजे प्रायमरी स्कूल हायस्कूल कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना व्यायामाचे आवड निर्माण करणे आपल्या आरोग्याविषयी जागरूक करणे आरोग्याचे महत्त्व समजवणे जेणेकरून येणारे पिढी ही सक्षम सशक्त करण्यास थोडाफार हातभार लागेल. बलशाली भारत होवो असे नुसते म्हणून चालणार नाही तर त्यासाठी कृती पण आवश्यक आहे आणि हे काम महेश वैद्य हे अतिशय तळमळीने आणि प्रामाणिकपणे राबवितात.
सारंग शेटे आणि अमृत शेटे यांच्या माध्यमातून मा पंडितराव दशरथ साहेब आणि त्यांच्याकडून रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद जी शिंदे सर सचिव काथे साहेब यांनी फिटनेस कॅम्प बद्दल प्रस्ताव मांडला आणि रोटरी क्लब कळंब सिटी जिल्हा धाराशिव यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.
चांगल्या सामाजिक उपक्रमास रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी हे नेहमीच सहकार्य करतात संस्थेच्या घरी चांगल्या योजना समाज उपयोगी राबवल्या जातात त्यामुळे महेश वैद्य यांनी रोटरी क्लब कळंब सिटी यांचे आभार मानले.
आतापर्यंत महेश वैद्य यांच्या या सामाजिक कामास मोठा मदतीचे हात गुरुवर्य विनोद कुमार गांधी उद्योगपती महेश दोशी, उद्योजक बाळासाहेब होशिंग, उद्योगपती संतोष काका कुलकर्णी , भाऊसाहेब फुलारी राजेंद्र जगताप, महेंद्र पेटकर सर लाभले त.
गयाबाई बहुउद्देशीय सामजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किसन कांबळे सर यांचे मार्गदर्शन आणि सर्वोतोपरी सहकार्य लाभत आहे असे चांगले लोक आपल्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपता येते आणी चांगले काम करण्यास प्रेरणा मिळते असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
समाजसेवक किसन कांबळे सर यांचे सामाजिक काम मोठे आहे. गयाबाई बहुउद्देशिय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मार्फत करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येते. महिन्यातून एकदा मोफत सोनोग्राफी या संस्थे मार्फत केली जाते याबद्दल विशेष गौरव यावेळी करण्यात आला.
गयाबाई बहुउद्देशीय संस्था च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सामान्य लोकांचे अंदाजे दीड कोटी रुपये वाचविले आहेत.
समाज सेवक किसन कांबळे सर यांचे एक स्वप्न आहे वृद्धाश्रमाचे ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्यासाठी त्यांना करमाळा येथील प्रसिध्द डॉक्टर श्रीराम परदेशी आणि समाजसेवक रामकृष्ण माने सर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.
म
