कळंब
किसन कांबळे सर (MCJ) 9970381507
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी जिल्हा धाराशिव महाराष्ट्र यांनी आयोजित नशा मुक्त भारत अभियान हा उपक्रम रण सम्राट क्रीडा मंडळ कळब संचालित, शहीद भगतसिंग प्राथमिक विद्या निकेतन कळंब जिल्हा धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शहीद भगतसिंग यांचे गुरु क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा आज स्मृतिदिन आहे त्यांना अभिवादन करून त्यांना स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना नशे पासून होणारे दुष्परिणाम समजून सांगितले आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन आणि गैरवर्तन आपल्या हातून घडणार नाही याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. नशा मुक्त असणे ही काळाची गरज आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवले पाहिजे, आपले घर आणि शाळा ही विद्यार्थ्यांचे मुलांचे मुलींचे संस्कार धाम आहेत तिथे विद्यार्थ्यांचे चांगल्या पद्धतीने जडणघडण होत असते तरीपण सभोवतालची परिस्थिती अनुकूलच असेल असे नाही म्हणजेच विद्यार्थ्यांनी प्रलोभनाला बळी न पडता आपले जीवन घडवावे असे मत व्यक्त केले.नशा मुक्त भारत होणे ही जशी काळाची गरज आहे तसेच सशक्त भारत ही पण काळची गरज आहे यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज अर्धा तास बेसिक व्यायाम केला पाहिजे त्या व्यायामाचे बेसिक ट्रेनिंग ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी प्रत्यक्ष कृती करून विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
श्वास आणि शरीराची क्रिया कशी असावी याबद्दल प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन केले यामध्ये शिक्षकांनी देखील सहभाग नोंदवला हे विशेष.
हे उपक्रमास रोटरी क्लबचे ऑफ कळम सिटी चेअध्यक्ष अरविंद शिंदे सर यांनी सहकार्य केले आणि मित्रवर्य पत्रकार मंगेश यादव हे उपक्रमास आवर्जून उपस्थित राहिले. मुख्याध्यापक एच एस शेळके सर यांनी उपक्रमास तात्काळ मान्यता दिली आणि अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी प्रेरणादायक आहेत तरी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे हे अत्यंत आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक शेळके सर यांनी महेश वैद्य यांना सन्मान पत्र देऊन गौरव केला. नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांचे तसेच रोटरी क्लबऑफ कळब सिटी चे आभार मानले.
मित्रवर्य किसन कांबळे सर मार्गदर्शक दिनेश सोरटे आणि ग्राहक पंचायत राज चे संजय मोरे उद्योजक महेश दोशी आणि प्रताप कांबळे गुरुवर्य विनोद कुमार गांधी यांनी करमाळा येथून फोन वरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाची प्रेरणा स्त्रोत आई वनमाला बबनराव वैद्य आहे असे भावनात्मक प्रतिक्रिया महेश वैद्य यांनी व्यक्त केली. हा उपक्रम अतिशय खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्याने अतिशय उत्साहात व्यायाम केला आणि नशा मुक्त भारत शपथ महेश वैद्य यांनी दिली.
शहीद भगतसिंग यांचे गुरु क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आज पुण्यतिथी आहे त्यांना अभिवादन करून त्यांना स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
243 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि 11 स्टाफ यांनी नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान मध्ये सहभाग नोंदवला.
