माननीय शिक्षणाधिकारी यांच्या पत्रान्वये दि. 10 मार्च 2025 पासून, सकाळ शाळेची वेळ 7.30 ते 12.30 अशी करण्याचे आदेशित केले होते. त्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेता, ती वेळ सकाळी 7.30 ते 11.30 करण्याचे व शनिवार शाळेची वेळ सकाळी 8 ते 11.30 करण्याचे निवेदन *महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे* , *माननीय शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब* यांना देण्यात. सदर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे, जिल्हा सरचिटणीस किरण सगेल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
