जेऊर प्रतिनिधी
संजयकुमार राजे घोरपडे 9921851055
भारत हायस्कुल जेऊर येथील इयत्ता 12 वी च्या परीक्षा केंद्रास करमाळा तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी भेट दिली त्यावेळी कॉपीमुक्त वातावरण पाहून समाधान व्यक्त केले.
भारत शिक्षण संकुल चे शिस्तप्रिय प्राचार्य आबासाहेब गोरख सरोदे सर यांचे तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे मॅडम यांनी परीक्षा नियोजन पाहून उस्फुर्त अभिनंदन केले.
प्रशालेचे उपप्राचार्य नागेश कांबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे सर, बहिस्थ बैठेपथक सौ चित्रा चाबुकस्वार कुंडलिक केकाण सर व इतर यांच्या देखरेखीखाली शिस्तप्रिय कॉपीमुक्त वातावरणात पार पडत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
वास्तविक पाहता परीक्षेचे औंचित्य साधून करमाळा तहसिलदार ठोकडे मॅडम यांनी नुकतीच भारत शिक्षण संकुलास आवर्जून भेट दिली.
यावेळी त्यांनी निरीक्षण करून उदगार काढले की शाळा व शाळेच्या वर्गखोल्या, कोपरे, आवार यामध्ये उल्लेखनीय स्वच्छता पाहण्यास मिळाली आहे. शालेय स्वच्छता गृहाची स्वच्छता विशेष स्वच्छ होती याचा आवर्जुन उल्लेख तहसिलदार यांनी केला.
प्रशालेतील शिक्षक व परीक्षा पर्यवेक्षक दक्ष आहेत हे ही त्यांच्या नजरेतून सुटले नाही.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्परतेने काम करीत राहीन असा विश्वास प्राचार्य आबासाहेब सरोदे यांनी तहसीलदारांना दिला.
करमाळा तालुक्याचे विद्यमन आमदार नारायण आबा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गादिया, संचालक सुनिल मामा बादल, जेऊर गावचे लोक नियुक्त नवोदित सरपंच पृथ्वीराज भैया पाटील यांनी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
