किसन कांबळे सर 9970381507
सोलापूर
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारिणी आदरणीय शामराव जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली. यावेळी जमलेल्या सर्व शिक्षक कार्यकर्त्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ सर यांनी संघटनेची रुपरेषा , ध्येयधोरण संघटनेचे कार्य समजावून सांगितले.
राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ सर जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे सर, जिल्हा सचिव किरण सगेल सर जिल्हा सल्लागार बाळासाहेब कारंडे सर जोशाबा सोसायटीचे अध्यक्ष / चेअरमन महेश्वर कांबळे सर माजी तालुका अध्यक्ष भानुदास बनकर सर मनपा अध्यक्ष नागेश गोसावी यांच्या उपस्थित खालील निवडी करण्यात आल्या.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किसन कांबळे सर करमाळा व श्रीमंत शिवशरण सर अक्कलकोट आणि यादव सर मंगळवेढा व खाडे सर सांगोला यांची निवड करण्यात आली.
तर जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून पुष्पा कांबळे मॅडम मोहोळ सविता सुकाळे मॅडम माढा यांची तर जिल्हा संघटक धनाजी खंडागळे सर यांची निवड करण्यात आली.
यावेळी अक्कलकोटचे तालुका अध्यक्ष म्हणून महांतेश्वर कट्टीमनी यांची माळशिरस ता अध्यक्ष म्हणून दत्तात्रय झेंडे यांची मंगळवेढा तालुका अध्यक्ष म्हणून नवनाथ सपताले अध्यक्ष तर युवराज कदम कार्याध्यक्ष सत्यवान खंदारे अध्यक्ष (मोहोळ ) बाबा शेरखाने सचिव ( मोहोळ) महादेव गवळी कार्याध्यक्ष मोहोळ सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून विवेकानंद ऐवळे यांची तर आत्माराम क्षीरसागर सचिव माढा कपिलनंदन कांबळे सचिव पंढरपूर यांची निवड करण्यात आली आणि वरील मान्यवरांना निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मारुती बेलभंडारे (माध्यमिक सचिव ) मनपा पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच अमोल भोसले मनपा सचिव यांचा सत्कार करण्यात आला.
