किसन कांबळे सर (MCJ) 9970381507
गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक 27/ 2 /2025 रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर गाळा नंबर 53 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे याचा गरजूंनी लाभ घ्यावा ही विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी केली आहे.
गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या वतीने विविध सामाजिक तथा समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्याचा एक भाग म्हणून दर महिन्याला 27 ला म्हणजे दर महिन्याच्या 27 तारखेला मोफत डोळे तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत असते.
सदरील शिबिरापर्यंत येण्यास काही अडचणी येत असतील किंवा रुग्णांची काही अडचण असेल तर किंवा काही मदत पाहिजे असेल तर त्यांनी किसन कांबळे सर यांच्या 9970381507 आणि संस्थेच्या 9001016009 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
