किसन कांबळे सर 9970381507 करमाळा जि. सोलापूर
वर्ष 1991, हनुमान जयंतीचा दिवस त्या दिवशी किल्ला विभाग करमाळा राम मंदिर येथे राहणारा युवक महेश वैद्य याने एक अनोखा विक्रम करमाळ्यातील सर्व व्यायाम पट्टू समोर प्रस्थापित केला होता त्याला आज 33 वर्षे पूर्ण झाली.
करमाळा तालुका तसेच सोलापूर जिल्हा मध्ये महेश वैद्य याने प्रथमच जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते.
करमाळा तालुक्यात ऐतिहासिक पौराणिक शहरात हनुमान जयंती दिनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे एका दमात पाच हजार दोनशे एक जोर काढण्याचा 5201 विक्रम प्रस्थापित केला.
त्यावेळ चे विद्यमान आमदार माननीय जयवंतराव जी जगताप हे उपस्थित होते.
विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर त्यांचा करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना , करमाळा अर्बन बँक त्यावेळेसचे तहसीलदार डी एस गायकवाड साहेब, त्यावेळचे पंढरपूरची डीवायएसपी भूषणकुमार उपाध्याय साहेब यांच्या हस्ते त्यांचा करमाळा येथे शासकीय सत्कार करण्यात आला.
करमाळा तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या हस्ते पंचायत समिती करमाळा येथे मोठा सत्कार करण्यात आला.
त्यावेळेस मामांनी 2100 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले होते अशी आठवण महेश वैद्य आवर्जून उल्लेखली.
गुरुवर्य विनोद कुमार गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वैद्य सराव करीत होते व पुढील ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करत होते.
महेश वैद्य यांचे प्राथमिक शिक्षण करमाळा नगर पालिकेच्या शाळा नंबर 3 येथे माध्यमिक शालेय शिक्षण महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे तसेच महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन शिक्षण करमाळा येथे पार पडले.
सोलापुरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यावेळीचे लोकप्रिय नगरसेवक कैलासवासी विजयराव मुळीक यांनी महेश वैद्यला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली.
त्यानंतर एका दमात 7777 जोर मारून सलग चार तास एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
नंतर पुढे लातूर येथे तात्कालीन पोलीस अधीक्षक माननीय भूषण कुमार जी उपाध्याय यांच्या पुढाकाराने व अष्टविनायक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रदीप राठी जी यांच्या उपस्थितीत एका तासात 3000 जोर मारून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
त्यानंतर सोलापूर चे माननीय महेश जी गादेकर साहेब यांनी महेशला मदतीचा हात दिला व पुढील 10200 या विक्रमास चालना दिली.
महेश वैद्य यांचे वडील कैलासवासी बबनराव दत्तात्रय वैद्य हे आर्मी मध्ये कार्यरत होते सैनिक होते ते 1962 आणि 1965 च्या युद्धात होते ते रणगाडा चालवत.
घरामधील आईचे संस्कार आणि वडिलांची छत्रछाया आणि राम मंदिरातील बटू काका, मंगल ताई चंद्रशेखर रामनवमीवाले मिरा मॅडम नाना रामनवमीवाले यांचे चांगले संस्कार मला लाभले असे महेश वैद्य यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले.
तसेच ललित शेठ अग्रवाल कै. प्रकाश अग्रवाल सुनील सूर्यपुजारी उदय येवले विवेक येवले तसेच पत्रकार अशपाक भाई अलीम भाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
33 वर्षांपूर्वी जेव्हा विक्रम प्रस्थापित केला त्यावेळेस माझा पहिला सार्वजनिक सत्कार राजपूत समाजाच्या वतीने झाला डॉक्टर श्रीराम परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे अनुभव आले सत्कार समारंभ झाले त्यामुळे जीवनामध्ये चांगले करण्याची ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करणे त्यासाठी प्रेरणा मिळाली.
पत्रकार अविनाश जोशी तसेच बाबुराव हिरडे वकील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यावेळेस संदेश साप्ताहिक नुसतेच सुरू झाले होते वकील साहेबांनी साप्ताहिक संदेश मधून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली त्यामुळे त्यांचा मी ऋणी आहे.
आजही संदेश करमाळा तालुक्यातील प्रभावी पेपर म्हणून प्रसिद्ध आहे.
त्यावेळेस करमाळातील जवळजवळ सर्व तालमीमध्ये महेश वैद्य यांनी सराव केलेला आहे त्यामध्ये सुतार तालीम सुतार गल्ली, सिद्धार्थ तालीम, मंगळवार पेठ तालीम, बाहेर तालीम करमाळा.
सोलापूर येथील क्रांती तालीम निराळे वस्ती
पापाया तालीम सुपर मार्केट सोलापूर येथे सराव केला.
सोलापूर आकाशवाणी केंद्रावर महेश वैद्य यांची भारतीय खेळ या विषयावर मुलाखत झाले होते ती सर्वत्र प्रसारित झाली होती त्यावेळेस आकाशवाणी केंद्र कडून अडीचशे रुपये मानधन मिळाले होते असेही महेश वैद्य यांनी आवर्जून सांगितले.
महेश वैद्य हे गेले 26 वर्षे पासून एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत करमाळ्याची त्यांची नाळ कायम जोडली आहे.
कोरोना महामारी ने थैमान घातले असताना सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते लोकांना आरोग्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली होती विशेष करून ग्रामीण भागात याविषयी आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महेश वैद्य यांनी करमाळ्यातील समाजसेवक किसन कांबळे सर यांच्याशी संपर्क साधला व आपल्या मनातील कल्पना त्यांना सांगितले की आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे त्यातून फिटनेस शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले पण नियोजन कसे करणार कारण त्यावेळेस नुसतेच कोरोनातून लोक सावरत होती तेव्हा लोकांकडे पैसा नव्हता मग कसे करणार मग समाज सेवक किसन कांबळे सरांनी पुढाकार घेऊन करमाळ्यातील नागरिकांसाठी मोफत फिटनेस कॅम्प आयोजित केला.
त्यानंतर अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा चे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी व सचिव बाळासाहेब होशिंग यांच्या पुढाकाराने सात दिवसाचा गुजर गल्ली येथील समंतभद्र हॉलमध्ये आदरणीय घुमरे सर राम कृष्ण माने सर विवेक येवले बीडिओ राऊत साहेब एडवोकेट लता पाटील मॅडम भावना गांधी मॅडम गुरुवर्य विनोद कुमार गांधी तसेच अमोल रणशूर सर निलेश गंधे, उद्योजक मित्र महेश दोशी प्रताप कांबळे, भाऊसाहेब फुलारी ,राजेंद्र जगताप गंगाधर पंत कुलकर्णी नाशिक यांचे सहकार्य लाभले.
ग्रामीण भागामध्ये आरोग्य विषयी अजूनही जागृती करण्याची खूप गरज आहे लोकांना व्यायाम म्हणजे काय माहित आहे पण कसा करावा किती करावा श्वास कधी घ्यावा कधी सोडवा याविषयी बरेच अज्ञान आहे असे दिसून आले त्यासाठी शंभर फिटनेस कॅम्प घेण्याच्या मानस त्याने व्यक्त केला.
सध्या भारत सरकारच्या नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत सहमत सोलापूर समाज कल्याण विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या नशा मुक्त भारत अभियान चे महेश वैद्य हे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करतात.
करमाळा तालुका बार्शी तालुका वैराग इत्यादी ठिकाणी आतापर्यंत बरेच नशा मुक्त अभियानाचे उपक्रम राबवले आहेत घरोघरी जाऊन त्याचा प्रचार केला आहे लोकांना व्यसनापासून कशी मुक्ती मिळेल त्याचे मार्गदर्शन त्यांनी घरोघरी जाऊन केले आहे त्याचबरोबर व्यायामाचे आवड निर्माण करणे फिटनेस बद्दल जनजागृती करणे हे दोन्ही काम अतिशय मनापासून महेश वैद्य करत आहेत..
व्यसनमुक्त अभियान सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्यातर्फे 100 विविध ठिकाणी प्रबोधन करण्याचा लोकांना नशेपासून प्रवृत्त करण्याचा उपक्रम राबविणार आहेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
ही 100 फिटनेस कॅम्प आणि शंभर नशा मुक्त भारत अभियान चे उपक्रम राबवण्यासाठी मान्यवरांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे विनंती महेश वैद्य यांनी केली आहे.
या कामात त्यांना पत्रकार नरेंद्र सिंह ठाकुर तसेच संतोष काका कुलकर्णी समाजसेवक किसन कांबळे सर उद्योजक महेश दोशी
पत्रकार अशपाक भाई अलीम भाई डॉक्टर श्रीराम परदेशी भाऊसाहेब फुलारी आदींचे सहकार्य लाभत आहे
यामध्ये विशेष करून आय एम एस स्कूलचे अध्यक्ष अमोल जी जोशी सर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे
तसेच आमचे मित्र प्रसाद कुलकर्णी प्रशांत कुलकर्णी सोलापूर हे सतत प्रोत्साहन देत असतात.
यामध्ये अकलूजचे विजय काका कुलकर्णी प्रसाद भागवत यांचे सहकार्य होत आहे..
तसेच मुंबईतील सर्व व्यक्ती विशेष लोकांचे मार्गदर्शन लाभत आहे.
यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समीर भाई साटा साहेब, रमेश जी भाटिया साहेब जय भाई दलाल साहेब रशमिनभाई ठक्कर सचिन जी सरदेसाई साहेब मित्र साहिल पाटील तसेच मिलिंद अक्रे यांची साथ
लाभत आहे.
विशेष करून टी पोस्ट ग्रुप कांदिवली पश्चिम महावीर नगर आणि हरीश जी मणियाल आणि विलास भोसले अण्णा नितीन काळसे कर आदिचे प्रोत्साहन मिळत आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत लेखक लिविंग लेजंड श शक्तिमान जी यांचे महेश वैद्य यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे तसेच जयकर शेट्टीगार साहेब यांनी पुढील कार्यक्रमास सहकार्य करण्याचे ठरविले आहे..
आदरणीय डॉक्टर भारत करमरकर करमरकर हेल्थ क्लबचे सर्वेसर्वा जिथून माझ्या कामची एक व्यायाम म्हणून सुरुवात झाली त्यांचे विशेष आभार आदरणीय मधुकर दरेकर सर यांच्यामुळे वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग या क्षेत्रात चांगली कामगिरी पार पडली तसेच आमचे मित्र प्रशांत पारकर यांचेही विशेष आभार वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले.
अशा सर्वांच्या मिळत असलेल्या मार्गदर्शन सहकार्य आणि आशीर्वादामुळे भविष्यात समाजवादी काहीतरी चांगले करण्याचे योजले आहे व अशा सर्व लोकांमुळे सतत काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते
मला माझ्या आई पासून म्हणजेच कै वनमाला बबनराव वैद्य यांचे पासून यांचा संस्कारापासून सामाजिक कामाची ओढ निर्माण झाली… माझे प्रेरणा स्त्रोत माझी आई आहे असे महेश वैद्य यांनी भावुक होऊन सांगितले.
तसेच वडीलधाऱ्या हक्काने पंडित सुभाषित राज यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत ते सतत काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देतात
आदरणीय प्रसंन कपूर साहेब जितेंद्र साहेबांचे भाऊ यांचे विशेष मार्गदर्शन होत असते.
लिविंग लिजंड ॲक्टर सनि देओल जी यांनी महेश वैद्य यांनी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा विशेष गौरव केला आहे.
अमिताव पानिग्रही कोटक महिंद्रा बँक इंडिया हेड आणि शाश्वत फायनान्शिअल ग्रुपचे चेअरमन रवी चौधरी आणि टीजेएसबी बँकेचे महेश जी बापट साहेब यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे…
अनुप जलोटा यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे..
महेश वैद्य यांच्या मनातील योजना सफल करण्यासाठी संकल्प पूर्तीसाठी ताकद मिळो
