कळंब
किसन कांबळे सर ( MCJ ) 9970381507
नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रम अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी तर्फे आयोजित उपक्रम नगरपालिका शाळा नंबर 2 कळंब शहर येथे मोठ्या उत्साहात संपन्न…
या उपक्रमास आवर्जून उपस्थिती रोटरी क्लब ऑफ सिटी चे अध्यक्ष अरविंद शिंदे सर उपस्थित होते .शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे सर यांनी ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष अरविंद जी शिंदे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपला देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाले तरीही नशा मुक्त भारत अभियान सारखे उपक्रम राबविले जातात ही एक प्रकारची शोकांतिका आहे. आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली परंतु त्याचबरोबर देशातील तरुणाई ही नशेच्या करत्यात म्हणजेच अमली पदार्थ च्या सेवनात अडकली आहे हे एका सर्वेनुसार पुढे आले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रायमरी स्कूल हायस्कूल कॉलेजेस ग्रामपंचायत येथे हा उपक्रम राबविण्याची अत्यंत गरज आहे.
विद्यार्थी दशेत या उपक्रमाची गरज आहे जेणेकरून ही पिढी तरी नशेच्या आहारी जाणार नाही याची खात्री आहे त्यासाठी खूप ग्राउंड लेव्हल वर काम करण्याची गरज आहे असे स्पष्ट मत या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष अरविंद शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अशा प्रकारचे अभियानाचे शाळकरी विद्यार्थ्यांना खूप गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून कळम शहरांमध्ये महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमात सहकार्य करत आहे या उपक्रमाची किती गरज आहे हे प्रत्यक्ष अनुभवत आहोत आणि कळंब तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील हे उपक्रम राबविले जातील अशी भावना व्यक्त केली.
मुख्याध्यापक मुकुंद नांगरे सर यांनी प्रास्ताविक केले आणि ह्या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होतात आणि भविष्यात विद्यार्थी बरेच काही शकतील असा आशावाद व्यक्त केला या उपक्रमांतर्गत सशक्त भारत अभियान देखील राबविण्यात आले यावेळेस महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांकडून बेसिक शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम करून घेतला, आपल्या जीवनात व्यायामाचे किती अनन्य साधारण महत्त्व आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान अशा प्रकारे राबविले तर त्याचे यश नक्कीच मिळेल अशी अपेक्षा कळंब सिटीरोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद शिंदे सर आणि शाळेत मुख्याध्यापक मुकुंद नांगरे सर यांनी व्यक्त केली. यावेळेस सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे महेश वैद्य यांनी आभार मानले.हा उपक्रम अतिशय चांगले वातावरणात पार पडला.
या उपक्रमात 213 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच 9 शिक्षक शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.
मुकुंद नांगरे सर मुख्याध्यापक रमेश चव्हाण सर प्रशांत सलगरे सर विशाल वाघमारे सर अमोल चव्हाण सर विनोद राऊत सर सायराणी कराड मॅडम सोनाली पाटील मॅडम गीताश्री नागटिळक मॅडम आदी शिक्षक शिक्षिका गण उपस्थित होते
