किसन कांबळे सर 9970381507
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंठाळकर वस्ती तळेहिप्परगा येथे शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत आज गुलमोहर येथे निसर्गरम्य वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी घेतला स्नेहभोजनाचा आनंद…
आजचे भोजन मंठाळकर वस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक शिक्षक यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या उपक्रमाचे सुंदर नियोजन या शाळेतील शिक्षिका सुरेखा कोरे मॅडम, दुर्गादेवी उरट मॅडम व संतोषी चौधरी मॅडम यांनी केले.
यावेळी लिंबराज जाधव यांनी शाळेतील अडीअडचणी जाणून घेतल्या व यापुढे शाळेला सहकार्य केले जाईल असे सांगितले.
तसेच या कार्यक्रमाकरिता सामाजिक कार्यकर्ते राजू बोराडे, तसेच मराठा सेवा संघाचे गोवर्धन गुंड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लिंबराज जाधव, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत सुरेखा कोरे यांनी केले तर दुर्गादेवी उरट मॅडम यांनी आभार मानले.
