किसन कांबळे सर 9970381507
उळे ग्रामपंचायत & अंगणवाडी क्र.1,2,3 च्या वतीने सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आदरणीय लिंबराज जाधव सर यांना देण्यात आल्या.
नेहमी गुरूस्थानी राहिलेले आदर्श व्यक्तीमत्व लिंबराज जाधव सर आहेत.
सन्माननीय लिंबराज जाधव सर आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. नेहमी शिक्षक हितासाठी लढणारा नेता ते आदर्श मुख्याध्यापक अशी वाटचाल करीत होते. त्याच बरोबर जिथे जाईल तिथे आपला मित्रपरिवार जोपासणारे, वाढवणारे शिक्षकांच्या विविध अडचणी समजून घेऊन त्याचे पूर्णपणे निराकरण करणारे असे बहुआयामी व्यक्तीमत्व मी पाहिले अशी चर्चा सर्व शिक्षक वर्गात सुरू आहे.
आदरणीय लिंबराज जाधव सर आज नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत त्यांना येथून पुढील आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य लाभो हीच सदिच्छा मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखेचे अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी व्यक्त केली आहे.
सेवानिवृत्त निमित्त उळे अंगणवाडी क्र.1,2,3 मधील सर्व विद्यार्थ्यांना सरपंच, उपसरपंच, सदस्य आदि मान्यवरांच्या हस्ते केळी फल आहार वाटप करण्यात आला.
