किसन कांबळे सर 9970381507
नेहरू युवा केंद्र संचालित व्यसनमुक्ती मानसोपचार केंद्रामध्ये नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या लाभार्थींसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा महेश वैद्य उपस्थित होते.
महेश वैद्य यांनी आपल्या भाषणात लाभार्थ्यांनी व्यायामाचे छंद जोपासणे आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे जेणेकरून मन नशेपासून परा वृत्त होईल व्यसन पासून होणारे तोटे म्हणजेच कुटुंबातील एखाद्या व्यक्ती व्यसनाधीन असेल तर त्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते त्यासाठी व्यसनाधीन व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर सतत आपला परिवार ठेवावा जेणेकरून व्यसन करण्यास मन धजणार नाही.
महेश वैद्य यांनी शाळेतील एक किस्सा शेअर केला पहिली ते चौथी प्राथमिक शाळेमध्ये व्यसनमुक्ती वर प्रबोधन होते त्यावेळेस महेश वैद्य यांनी मुलांना बोलते केले. मुले ही अनुकरण प्रिय असतात . घरातील वातावरणाचा त्यांच्यावर बालवयात खूप वाईट परिणाम होतो याची जाणीव घरातील पालकांनी नातेवाईकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
मुलांना जर पालक तंबाखू गुटखा मावा दारू आणायला सांगत असतील तर त्यांच्यावर बाला वयातच किती वाईट परिणाम होतात याबद्दल महेश वैद्य यांनी तळमळीने व्यसनापासून दूर राहावे अशी विनंती लाभार्थ्यांना केली.
मन ताब्यात ठेवण्यासाठी उत्तम आहार, चांगले विचार आणि उत्तम आरोग्य असणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्या व्यक्तींना आरोग्याचे महत्त्व समजले अशा व्यक्ती शक्यतो व्यसनपासुन दूर राहतात असे मत महेश वैद्य यांनी प्रखरपणे मांडले.
यावेळेस संस्थेचे संचालक अनिल जी हिंगे सर यांनी सूत्रसंचालन केले शाहीर रमेश जी खाडे सर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले व नशेपासून तसे दूर राहता येईल याबद्दल मार्गदर्शन केले आणि व्यसनमुक्ती केंद्र असणारे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योगा प्रशिक्षक गिरीश चंद्र रणसुभे यांनी केले.
महेश वैद्य यांना अनंतकुमार जोशी व मित्र किसन कांबळे सर हे नेहमी प्रेरणा देत असतात त्याचाही उल्लेख महेश वैद्य यांनी यावेळी केला…
