किसन कांबळे (MCJ) सर 9970381507
उजनी बॅकवाॅटर परिसरातील कुगाव ता. करमाळा ते शिरसोडी ता. इंदापूर पुलाचे काम प्रचंड वेगात चालु आहे. सदर जोडपुलामुळे येत्या काळात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राशी उजनी बॅकवाॅटर परिसरातून सर्वात जवळच्या मार्गाने जोडला जाणार आहे अशी माहिती सौ. तेजस्विनी दयानंद कोकरे मा. सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता करमाळा यांनी दिली.
■ कुगाव ते इंदापूर जोडपुलाचे फायदे
१) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अंतर १०० किलोमीटर कमी होणार
२) मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार
३) इंदापूर शहराची उलाढाल पाच पट वाढणार
४) तरकारी मालाला पुणे मुंबई बाजारपेठ तात्काळ उपलब्ध होणार
५) उसासाठी पुणे जिल्ह्यातील पर्यायी कारखाने उपलब्ध होणार
६) केळी निर्यातीस JNPT Mumbai बंदरावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होणार (सध्या देशात सर्वाधिक केळीची निर्यात उजनी बॅकवाॅटर परिसरातून होते)
७) रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार
८) उजनी बॅकवाॅटर टुरिझम ट्रॅन्गल परिसरातील पर्यटनाचा विकास होणार (भिगवन-टेंभूर्णी-कुंभेज-भिगवन)
९) हनुमान भक्तांची मागणी असणारा मार्ग पूर्ण होऊन हनुमान भक्तांची गैरसोय दूर होणार
१०) रूई येथील बाबीर देवस्थान ला भेट देणाऱ्या बाबीर भक्तांची गैरसोय दूर होणार
११) दर्जेदार शिक्षणाची सोय (इंदापूर, भिगवण, बारामती) होईल
१२) आरोग्याची सोयी सुविधा (इंदापूर, बारामती, पुणे)उपलब्ध होणार
१३) उजनी बॅकवाॅटर परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण होणार
१५) उजनी बॅकवाॅटर परिसरातील बोटींग व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार
१६) उजनी धरणात साधारण ६०,००० कोटी+ ची वाळू आहे त्यासाठी पर्यायी मार्ग तयार होणार
१७) बलुतेदार अन् अलुतेदार यांच्या पारंपारिक व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार
१८) मराठवाड्यातील हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल
१९) रोटी बेटी चे संबंध वाढणार
२०) मासेमारी बांधवांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार
२१) आपल्या परिसरातील जमीनीच्या किंमती प्रचंड वाढणार
२२) वाहतुकीची सोय उपलब्ध झाल्याने आपल्या परिसरात मोठ मोठे उद्योग धंदे वाढण्यास मदत मिळणार
२३) आपल्या परिसरात मुबलक पाणी साठा असल्याने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात घरे वाढणार
२४) शहरी भाग व ग्रामीण भाग अंतर कमी होण्यास मदत होणार
२५) फोटोग्राफी व्यवसायाला पर्यटकांमुळे चांगल्या पद्धतीने व्यवसाय वाढवण्याची संधी उपलब्ध होणार
२६) व्यवसाय वाढल्याने जाहिरात क्षेत्रात काम करणार्या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होणार
२७) स्थानिक परिसरातील बेरोजगार युवकांना गावातच रोजगार निर्माण होणार
२८) पश्चिम महाराष्ट्राला जोडल्याने मराठवाड्याच्या विकासाचा वेग प्रचंड वाढणार
● कुगाव ता करमाळा जि सोलापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठी असून कुगाव ला भीमा नदीच्या पात्राने तिनही बाजूला वेढले आहे. कुगाव गावच्या नदी पात्रासमोर सात गावांचे क्षेत्र असून यात सोगाव, वाशिंबे, गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ या गावांचा समावेश होतो. सध्या कुगाव गावात जाण्यासाठी चार जलमार्ग व एक भुमार्ग मंजूर आहे. भुमार्गाने जाण्यासाठी १२० किलोमीटर चा नाहक वळसा मारावा लागतो तर जल मार्गाने जाण्यासाठी शासनाने चार मार्ग मंजूर केले आहेत पण शासकीय बोटी किंवा जलथांबे अशा कोणत्याही प्रकारचा सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन खाजगी नौकांचीच मदत घ्यावी लागते त्यापैकी सर्वात जवळचा मार्ग कुगाव ते शिरसोडी जोडपूल मंजूर करून काम युद्धपातळीवर सुरू केल्याने या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
_सौ त
