संजयकुमार राजेघोरपडे सर 9921851055
प्रतिनिधी जेऊर
जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळा ,जेऊर चे माजी मुख्याध्यापक, करमाळा तालुका शिक्षक सोसायटी चे माजी चेअरमन, माजी तालुका मास्तर, अखिल महाराष्ट्र पेंशनर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अतुल घाडगे यांचे मातापिता पंडित घाडगे गुरुजी व त्यांच्या शिक्षीका पत्नी सौ स्नेहलता यांच्या 1962 साली झालेल्या 62 व्या लग्न वाढदिवसानिमित्त सत्कार प्रतिष्ठित व्यापारी मा सुनील बादल यांचे शुभहस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील बादल म्हणाले की घाडगे गुरुजींनी 39 वर्षाच्या सेवेत विद्यार्थ्यांत संस्कार रुजवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे महान कार्य पार पाडले आहे.
त्यांच्या कारकिर्दीत हजारो विद्यार्थी उच्च पदावर विराजमान झालेले आहेत असे प्रतिपादन सुनील मामा बादल यांनी भाऊक अंतकरणाने व्यक्त केले आहे.
जीवन जगण्याची कला गुरूजीनी विद्यार्थ्यांत रुजविली आहे.
घाडगे गुरुजींच्या सुविद्य माजी विद्यार्थीप्रिय शिक्षीका पत्नी स्नेहलता घाडगे यांनी जन्मभर साथ दिली म्हणून मला विद्यार्थी हितासाठी झोकून देऊन काम करता आले असे गुरुजींनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रम अचानक आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व स्तरातील चाहत्यांनी भेट घेऊन, फोनवर, चर्चेतून उभयतांना लग्नवाढदिवसाच्या मनोमन हार्दिक मंगलमय शुभेच्छा दिल्या.
हा सन्मान सोहळ्याचे आयोजन नियोजन मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे माध्यमिक विभागाचे तालुका अध्यक्ष संजयकुमार राजेघोरपडे यांनी केलेले होते. मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष किसन आप्पा कांबळे सर तथा मुख्याध्यापक जि प शाळा जेऊरवाडी यांनी शुभेच्छा देऊन लग्नवाढदिवसानिमित अभिष्टचिंतन केले.
सर्व उपस्थितांचे आभार माधव कांडेकर सर यांनी मानले.
ज
