किसन कांबळे सर 9970381507
जेऊर ते पुणे बंद झालेला मासिक पास 20/05/2024 पासून चालू झालेला आहे, यासाठी जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी सदस्य प्रविण करे पाटील व अन्य वारंवार पाठपुरावा करत होते.
यासाठी जेऊर प्रवासी संघटना, सोलापूर प्रवासी संघटना, संजय पाटील सर व सोलापूरचे पत्रकार बांधव थोरात यांनीही DRM ऑफिस मध्ये जाऊन वारंवार पाठपुरावा केला.
जेऊर ते पुणे मासिक पास चालू होण्यासंदर्भात सोलापूर DRM ऑफिस येथे संजय पाटील प्रदीप पवार , व आम्ही sr. Dcm योगेश पाटील यांना भेटून चर्चा केली होती त्यावेळेस त्यांनी या गोष्टी साठी प्रयत्न चालू केले होते अशी माहिती जेऊर रेल्वे प्रवाशी संघटनेचे सुहास सुर्यवंशी यांनी सांगितले.
मासिक पासाचे दर पुढील प्रमाणे आहेत याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी यांनी केले आहे.
जेऊर ते पुणे – मेल/ एक्स्प्रेस – 525
सुपरफास्ट. – 750
जेऊर ते दौंड – मेल/ एक्स्प्रेस – 355
सुपरफास्ट. – 580
जेऊर ते उरुळी -मेल/ एक्स्प्रेस 440
सुपरफास्ट. – 665
जेऊर ते केडगाव- मेल/एक्स्प्रेस 355
सुपरफास्ट. 580
वास्तविक पाहता जेऊर रेल्वे स्टेशन हे अत्यंत महत्त्वाचे आणि व्यस्त स्टेशन आहे. याच्या आजूबाजूला पाच तालुक्यातील प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी सतत जेऊरला येत असतात परंतू पुणे किंवा मुंबई किंवा भारतातील इतर शहरांशी जोडणारा प्रवास सुखकर आणि सहज होण्यासाठी पुरेशा प्रमाणात रेल्वे उपलब्ध नाहीत ही म
उदाहरण द्यायचे झाले तर ते हैदराबाद एक्सप्रेसचे आहे. ही रेल्वे सकाळी सहाच्या सुमारास असते. त्यात AC बोगी यांची संख्या जास्त आहे तर Sleeper बोगी खूपच कमी आहेत. जनरल डबे नाममात्र आहेत. तसेच लोकां ची गर्दी खूप होते. गाडीत जागा मिळवण्यासाठी होणारी धडपड यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. मग एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट रेल्वे प्रशासन पहात आहे का असा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी सतत व्यक्त करतात.
ही हैद्राबाद एक्सप्रेस सकाळी निघून गेल्यावर दपारी थेट दोन च्या आसपास डेमो आहे तर साडेतीन च्या आसपास सोलापूर पुणे एक्सप्रेस आहे.
म्हणजे तब्बल आठ ते दहा तास प्रवाशांन ताटकळत बसावे लागते हे आपल्या प्रगत देशात योग्य नाही. रेल्वे प्रशासन यावर उपाय का करत नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
हीच बाब सोलापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी घडते सकाळी पाच च्या सुमारास चेन्नई मेल निघून गेली की साधारणपणे साडेपाच प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.
जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस सह अन्य गाड्यांना थांबा अद्यापही न मिळाल्याने नाराजी कायम आहे
यावर रेल्वे प्रशासनातील अधिकारी कधी उपाय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…
