किसन कांबळे सर 9970381507 करमाळा
गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किसन कांबळे सर संजयराजे घोरपडे सर फिटनेस ट्रेनर आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष वनमाला वैद्य बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था करमाळा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र आणि नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी सचिव घुगेकर काका यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहूजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम होते.
यावेळी एकलव्य आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा जिल्हा सोलापूर यांचे तर्फे गणवेश वाटप आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांच्यातर्फे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊ कदम प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार विवेक आण्णा येवले व जेष्ठ समाजसेवक लक्ष्मण भोसले , मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माध्यमिक अध्यक्ष संजयकुमार राजे घोरपडे सर वाचनालय संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय मोरे आणि एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामकृष्ण भाऊ माने सर आणि शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संजय कुमार . राजे घोरपडे सर यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी भटक्या जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना मदत करून हातभार उचलावा असे सांगितले तसेच समाजसेवक किसन कांबळे सर यांनी आत्तापर्यंत केलेल्या आपल्या संस्थेमार्फत केलेल्या कामाचा आलेख संबंधितांना मार्गदर्शन रूपे सांगितला.
त्यावेळेस संतोष काका कुलकर्णी यांनी आपले ब्राह्मण समाजा फक्त ब्राह्मणांसाठी नाही तर इतर सर्व जाती धर्म साठी मदतीचा हात पुढे करतो त्यामुळे समाजातील दूरी संपण्यात मदत होते असे परखड मत व्यक्त केले.
समाजातील तळागळातील जे घटक आहेत त्यांच्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या रामकृष्ण माने सर यांच्या कार्याचा गौरव केला आणि उपक्रमाचे कौतुक केले.
रामकृष्ण माने सर यांनी मार्गदर्शन पण भाषणात सर्व मान्यवर व्यक्तींचे आभार मानले आणि त्यांचे लहानपणापासूनचे मित्र ज्यांनी त्यांचा हा खर्च प्रवास पाहिला आहे त्याचे साक्षीदार समाजसेवक लक्ष्मण भोसले यांचा आदराने उल्लेख केला आणि स्तुत्य उपक्रम बाबत संबंधिताचे आभार मानले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सांगळे सर किशोरकुमार शिंदे सर जाधव सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यास हातभार लावला.
यावेळेस किसन कांबळे सर संतोष काका कुलकर्णी संजयकुमार राजेघोरपडे तसेच
फिटनेस क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि नशा मुक्त भारत अभियान अतिशय प्रामाणिकपणे काम करत असलेल्या महेश वैद्य यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरकुमार शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक सांगळे यांनी मानले. हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.
