12 मार्च रोजी दुपारी चार वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय दत्तपेठ येथे पार पडला.
या प्रसंगी महिलांसाठी “सखी मेळा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
यामध्ये ग्राहक गीत,योग गीत प्रात्यक्षिक, गीता प्रार्थना ,एकपात्री नाटक, मूकाभिनय, डंब डान्स, लावणी , देशभक्ती पर गीत , राष्ट्रीय एकत्मता मुक अभिनय, नऊवारी साडी व फेटे बांधून लेझिम ,रेट्रो डान्स, रिमिक्स डान्स, दादा कोंडके रीमिक्स डान्स,सोलो डान्स, ग्रुप डान्स, तलवार डान्स, गायन, काठी work out , mother doughter dance, इत्यादी विविध रंगी कला महिलांनी सादर केल्या .
प्रत्येक सादरीकरण हे एकापेक्षा एक बहारदार होते,महीला प्रेक्षकांनी शिट्या व प्रचंड टाळ्यांनी भरभरून दाद दिली, व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, या कार्यक्रमा ला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .
कार्यक्रम पाहायला सर्व स्तरातील महिलांनी गर्दी केली होती . कार्यक्रमासाठी करमाळा नगर परिषदे चे मोलाचे सहकार्य लाभले .
कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायती चे मा. शशीकांत नरुटे, मा. भीष्माचार्य चांदणे, मा. चक्रधर पाटील, निलेश कुलकर्णी, शिंदे, कोळेकर, पत्रकार मा. अशपाक सय्यद, मा विजय देशपांडे तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ माधुरी परदेशी, सौ निलिमा पुंडे, सौ मंजिरी जोशी, सौ . ललिता वांगडे, सौ . रेखा परदेशी, सौ . सारीका पुराणिक, सौ . निशिगंधा शेंडे व सौ सुलभा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती माने यांनी केले . कार्यक्रम खूप दर्जदार झाला . खूप वर्षांनी माहिलांसाठी आपले कलागुण सादर करायला खुले व्यासपीठ मिळाल्याने महिलांमध्ये खूप आनंद व उत्साह दिसून येत होता .
जागा कमी पडल्याने उभे राहून काही महिलांनी आनंद घेतला. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठीच होता . यावेळी सहभागी प्रत्येक महिले स भेट वस्तू देण्यात आली .
महिलांना शारीरीक आणि मानसिक ताण तणावातून मुक्त करायचे असेल तर त्यांना अरोग्याकडे लक्ष पुरवावे लागेल असे मत हॅपी माईंड हॅपी हेल्थ चे अध्यक्ष महेश वैद्य यांनी व्यक्त केले…
ऑन लाईन न्यूज ” आपला भारत ” चे संपादक किसन कांबळे सर यांच्याशी बोलताना महेश वैद्य यांनी 12 मार्च रोजी दुपारी चार वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय दत्तपेठ येथे कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले…
