सोलापूर जिल्हा आणि करमाळा तालुका भूषण विक्रमवीर महेश वैद्य यांची भाजप च्या उद्योग आघाडी चे सदस्य पदी निवड करण्यात आली. ही निवड संतोष काका कुलकर्णी अध्यक्ष भा. ज. पा प्रणित करमाळा तालुका उद्योग आघाडी तर्फे करण्यात आली…
त्या वेळी करमाळा तालुक्यातील प्रसिध्द समाजसेवक किसन कांबळे सर, शुभम कुलकर्णी आणि समस्त परिवार उपस्थित होता.
एक प्रसिद्ध व्यायाम पट्टू म्हणून महाराष्ट्रात तसेच सोलापूर जिल्ह्यात परिचित आहेत. सोलापूर जिल्हा भूषण आणि करमाळा तालुका भूषण पुरस्कार मिळाला आहे. सध्या ते केन्द्र सरकार द्वारा सुरू असलेले नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मार्फत ब्रॅण्ड अंबेसिडर म्हणून कार्यरत आहेत.
कै. वनमाला बबनराव वैद्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचे फिटनेस या क्षेत्रात योगदान मोठ्या प्रमाणात आहे फिटनेस जागृतीसाठी ठिकठिकाणी फिटनेस कॅम्प आयोजन महेश वैद्य करीत असतात.
या उपक्रमात त्यांना करमाळा शहरातील प्रसिद्ध समाजसेवक किसन कांबळे सर यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे तसेच अखिल ब्राह्मण समाजसेवी संस्था नाशिक केंद्र करमाळा चे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी सचिव बाळासाहेब होशिंग तसेच सर्व कार्यकारणी सदस्य पुरुष आणि महिला यांचे सहकार्य लाभत आहे.
तसेच पत्रकार मित्र अलीम शेख अशपाक भाई मित्र नरेंद्र ठाकूर , भाऊसाहेब फुलारी , राजेंद्र जगताप यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.तसेच पत्रकार अविनाश जोशी आणि सुनील पुजारी विवेक येवले यांचेसहकार्य लाभत आहे.
करमाळा उद्योग आघाडीमध्ये खूप जोमाने काम करू असे यावेळी महेश वैद्य यांनी सांगितले. समाजसेवेची प्रेरणा आपल्याला आपल्या आई कै. वनमाला बबनराव वैद्य यांच्यापासून मिळाली अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली.
महेश वैद्य यांच्या मातोश्रीचे 19 जानेवारी 2024 रोजी दुःखद निधन झाले आहे पण आईची प्रेरणा सतत मनात राहील असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुका उद्योग आघाडी तर्फे तालुक्यातील ग्रामीण भागात सर्व समाज घटकांसाठी फिटनेस कॅम्प चे आयोजन करावे असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले व यास श्री संतोष काका कुलकर्णी अध्यक्ष करमाळा तालुका उद्योगा आघाडी सर्व प्रकारे सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
समाजसेवक किसन कांबळे सर पत्रकार से अविनाश जोशी यांनी या स्तुत्य उपक्रमास पाठिंबा दिला व अशाप्रकारे लोकांमध्ये जनजागृती व्हावी असे मत व्यक्त केले .
महेश वैद्य यांचा फिटनेस क्षेत्रातील अनुभव फार मोठा आहे. सर्वसामान्य जनतेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले पाहिजे.
महेश वैद्य यांनी जनतेला फायदा होईल काम करावे असे मत समाजसेवक किसन कांबळे सर यांनी व्यक्त केले.
तसेच आतापर्यंत या उपक्रमास मुंबईतील गदर चित्रपटाचे लेखक शक्तिमान जी डायरेक्टर अनिल शर्माजी तसेच हरीश मणियाल सचिन सरदेसाई अरविंद भाई सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच उद्योगपती समीर साठा रमेश जी भाटिया साहेब रिलायन्स उद्योग समूह यांचे मो लाचे सहकार्य मिळतं आहे.
तसेच ठाणे जनता सहकारी बँकेचे महेश बापट साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे तसेच कोटक महिंद्रा बँक इंडिया हेड श्र अमित पनिग्रही आणि रवी भाई चौधरी शाश्वत सर्विसेस चे चेअरमन मुंबई यांनी महेश वैद्य यांच्या या उपक्रमास भविष्यात सहकार्य करण्याचे प्रॉमिस केले आहे. चांगल्या उपक्रमास सर्व स्तरातून सहकार्य मिळते त्यासाठी काम साठी संपूर्णपणे वाहून घेणारे यांच्या पाठीशी सर्व स्तरातील लोक उभे आहेत अशा लोकांमुळे काम करण्यास प्रेरणा मिळते ताकद मिळते महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समोरप समाजसेवक किसन कांबळे सर यांनी केला व संतोष काका कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
संतोष काका कुलकर्णी यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थित त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. सुधीर कुलकर्णी कानेगावकर तसेच संतोष कुलकर्णी कानेगावकर यांनी महेश वैद्य यांच्या पुढील कार्यला शुभेच्छा दिल्या. याबद्दल महेश वैद्य यांनी सर्वांचे आभार मानले.
