किसन कांबळे सर 9970381507
28 मे जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसोबत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. मंगळवार दिनांक 28/5/2024 रोजी असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या आणि कचरा वेचक कुटुंबातील किशोरवयीन मुलीसाठी मो.रफी नगर गोवंडी मुंबई येथे संकल्प संस्था तसेच संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाने जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त किशोरवयीन मुलीसाठी एक दिवसीय कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्त्या दिपा गमरे, चंद्रभागा पवार आणि विनोद हिवाळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमाची सर्व जबाबदारी सुनिता उघडे आणि सीमा परिवार यांनी खूप छान प्रकारे पार पाडली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सीमा परीहार यांनी केली. सामाजिक कार्यकर्त्या दिपा गमरे आणि चंद्रभागा पवार यांनी व्यक्तिगट स्वच्छता या विषयासंदर्भात खेळाच्या मनोरंजन माध्यमातून मानवी शरीर रचना कशी असते किशोर अवस्था म्हणजे किशोर अवस्था मध्ये कोणते मानसिक, शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. कोणत्या वयात मुलींना मासिक पाळी येते, त्यावेळेस शारीरिक स्वच्छता कशा प्रकारे असावी. कोणत्या प्रकारे आहार घेणे आवश्यक आहे मासिक पाळी विषयावर समज गैरसमज काय आहे स्वतःची काळजी व निघा कशी घ्यावी आणि वापरात येणाऱ्या अत्याधुनिक साधनांचा वापर कसा करावा तसेच अंधश्रद्धा यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींनी पथनाट्या च्या माध्यमातून मासिक पाळी बद्दल आपले वैयक्तिक अनुभव अनुभव सांगितले.
संकल्प संस्था चे अध्यक्ष विनोद हिवाळे सर यांनी आणि संकल्प संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची आणि मुलांच्या अधिकार संदर्भात महत्वाची तसेच कार्यशाळा चे महत्व काय होते? त्यांची आवश्यकता होती का? काय शिकण्यास मिळाले यासंदर्भात मार्गदर्शन केलं. अतिशय आनंदात व खेळी वेळी मनोरंजनात्मक कार्यशाळा संपन्न झाली.
किशोरी मुली अतिशय आनंददायी आणि उत्साही झाल्या. त्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
तसेच सर्व सहभागी मुलींना सॅनिटरी नॅपकीन आणि अल्पोपहार देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य विद्या पाटेकर मॅडम आणि सविता हेंडवे यांचे लाभले. कार्यक्रमाची सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन सुनिता उघडे यांनी केले.
