किसन कांबळे सर 9970381507
गदर एक प्रेम कथा आणि गदर 2 चे प्रतिभावान लेखक शक्तिमान जी तलवार साहेब यांना भेटण्याचा सुवर्णयोग नुकताच आला. कै. वनमाला बबनराव वैद्य चॅरिटेबल ट्रस्ट व हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष आणि नशा युक्त भारत अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कार्यरत असलेले महेश वैद्य आणि गयाबाई मल्टिपर्पज समाजसेवी संस्था करमाळा चे अध्यक्ष समाजसेवक किसन कांबळे सर यांनी शक्तिमान साहेबांची अंधेरी पूर्व येथील त्यांचा निवासस्थानी भेट घेतली.
शक्तिमान जी यांच्याकडून विविध विषयावर चर्चा झाली. त्यावेळी महेश वैदय व किसन कांबळे सर भारावून गेले. माणसाच्या जीवनात संकटे समस्या असतील तरच माणूस जगू शकतो त्या सोडविण्यासाठी तो प्रयत्नशील राहतो आणि वयाच्या 50 शी पर्यंत शरीर माणसाचे गुलाम असते आणि 50 शी नंतर माणूस शरीराचा गुलाम होतो असे विचार शक्तिमान साहेबांनी व्यक्त केले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगले शरीर चांगले आरोग्य तसेच चांगले विचार असणे आवश्यक आहे. शक्तिमान साहेब आज जवळ जवळ 70 वर्षे वयाचे आहेत. ते खूप फिट आहेत.
त्याचे रहस्य ते दररोज सकाळी एक ते दीड तास व्यायाम करतात त्यांच्या घरातच होम जिम आहे. महेश वैद्य हे त्यांचे पर्सनल ट्रेनऱ म्हणून कार्यरत आहेत. महेश वैद्य यांना या दिग्गज व्यक्तिमत्वाचा गेली 20 वर्ष सहवास लाभला आहे व लाभत आहे.
त्यामुळे महेश वैद्य यांच्यात कामाची प्रेरणा शक्तिमानजीमुळे आली त्यांचे चांगले विचार आणि मार्गदर्शन यामुळे चांगले काम करण्याची नेहमीच तळमळ असते असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
समाजसेवक किसन जी कांबळे सर यांनी ते करत असलेल्या समाजकार्याचा थोडक्यात लेखाजोखा शक्तिमान साहेबांना सांगितला तेव्हा साहेबांनी त्यांचे कौतुक केले व चांगल्या कामासाठी आशीर्वाद दिले.
किसन जी कांबळे सर यांनी शक्तिमान साहेबानी दिलेले विचारापासून प्रेरणा घेऊन दररोज किमान 1 तास तरी शरीराकडे लाक्ष देईल किमान एक तास तरी व्यायाम करेल असे शक्तिमानजी समोर सांगितले.
भारतीय सिनेमा क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीमत्वाला भेटण्याचा आनंद महेश वैद्य आणि ‘ किसन कांबळे सर यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
प्रशिक्षक महेश वैद्य हे त्यांच्या नेहमी सानिध्यात असतात. सुमारे 2 तास शक्तिमान साहेबां सोबत कसे गेले ते कळलेच नाही. त्यांचा विचारांची शिदोरी घेऊन आम्ही एका नवीन हेल्दी जीवन शैली जगण्याचे ठरवून त्यांचे आशिर्वाद घेतले..
शक्तिमान साहेबांनी आज पर्यंत अनेक ब्लॉक ब्लस्टर हिंदी सिनेमे रसिकांसमोर दिली आहेत. प्रत्येक मूव्ही मध्ये समाजासाठी एक चांगला मेसेज असतो.
त्यानी जाल, आशिक आवारा , वर्तमान, कसम तेरी कसम, भाभी, पुलिसवाला गुंडा, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, द हिरो लव स्टोरी ऑफ स्पाय, वीर, गदर एक प्रेम कथा आणि गदर टू असे एकाहून एक सरस उच्च दर्जाचे चित्रपट शक्तिमान यांच्या लेखणीतून साकार झालेले आहेत.
अशा या प्रतिभावान दिग्गज लेखकास समस्त महाराष्ट्र सोलापूर जिल्हा तसेच आपला करमाळा तालुका तर्फे मानाचा मुजरा आणि भविष्यातील त्यांच्या येणाऱ्या त्यांच्या लेखणीतून साकारणाऱ्या सर्व चित्रपटांना भरघोस यश मिळो हीच सदिच्छा व्यक्त करून बाहेर पडलो.
