ऊ
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवा अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
या निवेदनाच्या प्रती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की , अनेक सहकारी साखर कारखान्याचे गाळप बंद होण्याच्या मार्गावर आहे . त्यामुळे ऊस वाहतूकदार व ऊसतोड मजुरांची टोळी यांच्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ही बाब गंभीर असून कृषी प्रधान देशाला लाजवणारी आहे.
ऊसतोड मजूर प्रत्येक टनामागे १२० ते १५० रुपयांची मागणी करत आहेत . तसेच त्यांच्या रोजच्या जाण्या-येण्याचा खर्च म्हणून ५००/- रुपये मागत आहेत.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर असणाऱ्या वाहन चालकासाठी दररोजचे ४०० रुपये प्रमाणे मागणी करत आहेत. ही बाब शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणारी आहे. याची स्वतंत्र चौकशी व्हावी.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाची आपण तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व हा देश कृषीप्रधान आहे हे सिद्ध करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .
