महाशिवरात्रीचे पर्व आणि जागतिक महिला दिन असा दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा या संस्थेच्या वतीने करमाळा तालुक्यातील होतकरू व धडाडीच्या काम करणाऱ्या व उद्योजक महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्ष सौ माधुरी परदेशी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. नीलिमाताई पुंडे यांची उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांनी केले
सो मंजिरी जोशी व सौ. सारिका सारंग पुराणिक यांनी कवितेचे वाचन केले तसेच किसन कांबळे सर आणि संजय राजे घोरपडे सर यांनी कवितेचे वाचन करून कार्यक्रमात रंगत आणली
उपस्थित सर्व महिलांनी आपण करत असलेल्या व्यवसायाचे व तो व्यवसाय कसा उभा केला यासंबंधीची माहिती आपल्या भाषणातून व्यक्त केली यामध्ये निशिगंधा शेंडे तसेच रेखा परदेशी यांनी आपण करत असलेल्या कामाची रूपरेषा सांगितली
तसेच माधुरी परदेशी यांनी आपले अनुभव सर्वांसमोर सांगितले त्या ग्राहक मंचाचे काम करतात.
तसेच निलिमाताई पुंडे यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातील अनुभव कथन केला आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली.
वंदना पाटील मॅडम तसेच ललिता वांगडे यांनी अशा प्रकारचा सत्कार प्रथमच होतो आहे अशी भावना व्यक्त केली.
तसेच यावेळी माधुरी भणगे,पूजा मसलेकर ज्योती कुलकर्णी , वैष्णवी कुलकर्णी उपस्थित होत्या
महिलांचे अनेक प्रश्न असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या माजी मुख्याध्यापिका सौ नीलीमाताई पुंडे यांनी केले
उपस्थित महिलांचा सत्कार अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक केंद्र करमाळा याचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीचे अध्यक्ष श्री संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास करमाळ्यातील प्रसिद्ध
समाजसेवक किसन कांबळे सर यांनी जागतिक महिला दिन सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय राजे घोरपडे सर यांनी केले आणि आपल्या वाणीने कार्यक्रमात उत्साह निर्माण केला
उद्योजक श्री संतोष काका कुलकर्णी यांनी आपण यशस्वी उद्योजक कसे बनलो याचे कथन केले व अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांच्या वतीने महिलांच्या समस्या सोडण्याकरता प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कै. वनमाला बबनराव वैद्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि हॅप्पी मॅरेज हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महेश वैद्य यांनी केले
सध्या नशा मुक्त भारत अभियान केंद्र सरकार द्वारा नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर म्हणून ते काम करत आहेत सध्या बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात काम करीत आहेत. यांना आरोग्याची काळजी व फिटनेस महत्त्व समजले अशा व्यक्ती सहसा कोणत्याही नशेच्या आहारी जात नाहीत असा असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले व फिटनेस द्वारे नशा मुक्ती कशी होईल किंबहुना याकडे लोक कसे वळणार नाहीत याविषयी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम माधुरीताई परदेशी यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला सर्व महिलांचे उपस्थित राहिल्याबद्दल संतोष काका कुलकर्णी यांनी आभार मानले व कुठल्याही उद्योगात येणाऱ्या अडचणी विषयी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
