जेऊर प्रतिनिधी
संजयकुमार राजेघोरपडे 9921851055
मराठा आरक्षणाच्या प्रश्न सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी.
या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे.
वारंवार उपोषणे केल्याने शरीर साथ देत नाही आणि सरकार त्यांच्या जीवाची परीक्षा घेत आहे.
त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती
संभाजी ब्रिगेड ने केलेल्या आव्हानाला मोठ्या संख्येने व सक्रिय पणे जेऊर ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने 100% पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला…
संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांचे यावर विशेष लक्ष होते..!
