करमाळा दिनांक 1 जुलै 2024
किसन कांबळे सर 9970381507
करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा. राजकुमार पाटील साहेब हे नियत वयोमानानुसार दिनांक 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले .
त्यानिमित्त त्यांचा सेवा पूर्ती कृतज्ञता सोहळा शनिवारी दि. 29 जून 2024 रोजी पंचायत समिती सभागृह करमाळा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. या सत्कार समारंभाला उत्तर देताना मा. गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील बोलत होते.
पैशांसाठी लाचार होऊन काम करणारे कर्मचारी यांची संख्या खूप कमी आहे नगण्य आहे पण या लोकांच्या मुळे च संपूर्ण शासकिय यंत्रणा बदनाम झाली आहे. आणि मग हे लोक लाच घेताना पकडले जातात.
सेवा करताना एकमेकांना समजून घेऊन काम केले तर काम खूप चांगले होते असेही त्यांनी सांगितले.
या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपसंचालक कार्यालय पुणे येथील शिक्षण निरीक्षक मा. रावसाहेब मिरगणे रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. महारुद्र नाळे करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत , करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. विनोद घुगे रायगड ,माण खटावचे गटशिक्षणाधिकारी मा. माणिक राऊत ,शिरूर घोडनदी पुणे येथील गटशिक्षणाधिकारी मा. अनिल बाबर देऊळगाव राजेचे गटशिक्षणाअधिकारी मा.दशरथ पाचंगरे , मुरुड जंजिऱ्याचे गटशिक्षणाधिकारी मा.बाबूलाल पाखरे , पंचायत समिती करमाळा येथील शिक्षण विस्ताराधिकारी मा. जयवंत नलवडे ,मा. मिनीनाथ टकले मा मा.नितीन कदम सर्व केंद्रप्रमुख, माध्य व प्राथमिक सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, गटसाधन केंद्रातील विषयसाधन व्यक्ती,विशेष शिक्षक व विविध शिक्षक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी तसेच मा पाटील साहेबांचे कुटूंबीय-नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला.
सर्व अधिकारी, शिक्षक ,नातेवाईक यांनी पाटील साहेब यांच्या कामकाजाचे कौतुक केले व सर्वांशी आपुलकीने मिळून मिसळून कामकाज केल्याने सर्वांनी त्यांना भावी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव सर , राजकुमार खाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमृत सोनवणे सर यांनी केले.
