करमाळा
किसन कांबळे सर 9970381507
सोमवार दि.०१/०४/२०२४ रोजी जि प प्राथमिक शाळा पाडळी व जि प प्राथमिक शाळा जयवंतनगर (पाडळी) शाळेस करमाळयातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व शेटे हॉस्पिटलचे प्रमुख मा. डॉ. विशाल शेटे व मा. डॉ. प्रिती शेटे यांची कन्या ओवी हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व मुलांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून उन्हाळी टोपीचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टरांचा पाडळी गावातील ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक यांचे तर्फे सन्मान करण्यात आला सन्मानाला उत्तर देताना डॉक्टरांनी मुलांशी संवाद साधला.
मी सुद्धा एका खेड्यातून डॉक्टर झालो आहे तुम्ही पण अभ्यास करून मोठे व्हावे व स्वतःच्या पायावर उभे रहावे अशी प्रेरणा दिली तुमच्या शाळेतील सर्व शिक्षकवर्ग उत्कृष्ट आहे असे गौरवोद्गार काढले
खेड्यातील मुलांना किती अडचणींना तोंड द्यावे लागते याची मला जाणीव आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त फूल ना फुलाची पाकळी म्हणून सर्वांना उन्हाळी टोपी वाटप करत आहे .
डॉ. प्रिती शेटे मॅडम यांनी पण शाळेतील विद्यार्थ्याना व त्यांच्या मातांना आरोग्य ,आहार व स्त्रीयांच्या आरोग्या बद्दल माहिती उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले.
यावेळी पाडळी गावचे सरपंच , उपसरपंच , विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील ग्रामस्थ , मातापालक सदस्य व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक चंद्रकांत जाधवर यांनी केले तर सूत्रसंचलन प्राथमिक शिक्षक उमेश कानडे यांनी केले तर आभार दिपमाला रोडे यांनी मानले.
