किसन कांबळे सर 9970381507 दौंड
विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी असणारी भीती कमी व्हावी व त्यांना शाळेत येण्याची आवड लागावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोरवडी.ता. दौंड येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक-१ चे शुक्रवार दि. 19 रोजी मोठ्या थाटामाटात व उत्साहात आयोजन करण्यात आले.
दाखल पात्र विद्यार्थ्यांची लेझीम, ताशा, ढोल वाजवत वाजत गाजत ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,शिक्षक,पालक यांच्यासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दखलपात्र विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या विद्यार्थ्यांची वर्ग पूर्व तयारी तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची उंची,वजन घेऊन पालकांना दिलेल्या नोंदणी पत्रकावर त्यांची नोंद करण्यात आली.
तसेच बौद्धिक विकास,शारीरिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, गणनापूर्व तयारी अशा रीतीने सुंदर व आकर्षक टेबल शाळेच्या शिक्षकांनी सुसज्ज करून ठेवले होते. त्या त्या टेबलावरील त्या त्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळापूर्व तयारी विकासाची चाचणी पालकांसमोर करण्यात आली.
तशी नोंद बालकांसमोर नोंद पत्रकात करून पालकांना येत्या पंधरा दिवसांमध्ये त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना गोडधोड खाऊ देण्यात आला. सुंदर सेल्फी पॉईंटवर फोटो घेऊन सेल्फीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.यावेळी उभारलेली शैक्षणिक गुढी आकर्षण बिंदू ठरली.
शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे नियोजन मुख्याध्यापक जयश्री कांबळे मॅडम, शिक्षक गौतम कांबळे सर, कोंडेजकर सर, भद्रे मॅडम, कदम मॅडम व कोंडेजकर मॅडम या शिक्षकांनी केले होते.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अनमोल लाभले.
